Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचा'अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते'

‘अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते’

पुणे: बीडमध्ये सत्ताधारी माफियांचे हित साधण्यात गुंतले आहेत. असा आरोप करत भाजप नेत्या पंकजा मुंडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. याला मुद्देसूद उत्तर देत जिल्ह्यातील लसीकरणाची माहिती देतांना पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.

राज्यात कोरोना रुग्नासंख्यांची आकडेवारी हि दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी लस, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यामुळे याची झड हि सामान्य जनतेला भोगावी लागत आहे. अश्यातच बीड जिल्ह्यात सुद्धा लसींची कमतरता भासत आहे. असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यात लक्ष घालण्याची मागणी केली होती. पंकजा यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी ट्वीटच्या माध्यामातून प्रतीउत्तर दिले आहे. तसेच डॉ. प्रीतम मुंडे यांना सुद्धा टॅग केले आहे.     

आपल्या ट्वीट मध्ये धनंजय मुंडे म्हणतात

-अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या २ लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल.

-बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो.

-जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे ६८०० व कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.

-ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल!

– जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून १४९४७३ नागरीकांना पहिले तर १९७३२ नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको.

-कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त २ लाख लसींचा वितरणासह शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी आपल्यासाठी देत आहे! आपण शेअर केलेल्या २० लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे,आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

पत्रात पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. परिस्थिती गंभीर आहे. आता पर्यंत ७२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता पर्यंत ३४ हजार ९८९ लोक बाधित झाले आहेत. आरोग्य यंत्रणा आहोरात्र काम जरी करत असली रेमडीसिविर इंजेक्शनचां तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचा नातेवाईकांना मोठा मनस्ताप होत आहे. पुरेशी लस नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडत आहेत. या साऱ्याकडे आपण जातीने लक्ष घालावे आणि रेमडीसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे.” अशी विनंती पंकजा मुंडे यांनी केली.

राज्याला २ लाख लसीचे डोस मिळाले आहेत. त्यातील बीड जिल्हाला केवळ २० डोस मिळाले आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे.हे अतिशय खेदकारक आहे. त्यामुळे त्याकडे गांभीर्याने लक्ष देवून  लसीचे डोस उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सुद्धा पंकजा मुंडे यांनी केली. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहित आहे. जनतेच्या हितासाठी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत.अस म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता बोचरी टीका केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments