हिवाळा संपल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील-पेट्रोलियम मंत्र्यांचा दावा
मुंबई: हिवाळ्यात इंधनाच्या किमती वाढतात. हिवाळा संपल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील असा दावा केंदीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केला आहे. प्रधान यांच्या या दाव्यानंतर त्यांच्यावर टिका होत आहे. एएनआयशी बोलताना प्रधान यांनी हा अजब दावा केला आहे.
सध्या महागाई मुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे. आजच गसच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर या महिन्यात आता पर्यंत ३ वेळा गस वाढ झाली आहे. या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनांचे दर वाढत असल्याने त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. हिवाळ्यात इंधनाच्या किमती वाढतात. हिवाळा संपल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असून मागणी वाढल्याने दर वाढल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.
Increase in petroleum price in international market has affected consumers too. Prices will come down a little as winter goes away. It's an international matter, price is high due to increase in demand, it happens in winter. Price will come down: Union Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/hYPqHt7b1S
— ANI (@ANI) February 26, 2021
एका कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सुद्धा इंधन दरवाढीवरून हात झटकले आहेत. दर वाढ रोखने आपल्या हातात नसून इंधन दरवाढ धर्मसंकट असल्याचा उल्लेख केला आहे.
तर राज्यातील विरोधी पक्ष कर कमी करण्याच्या सूचना राज्यसरकारला देत आहे. पुण्यात शुक्रवारी पेट्रोलचा प्रतिलिटर दर ९६.९६ आहे. तर डिझेलचे प्रतिलिटर दर ८६.७२ वर पोहचला आहे.