मृत्यू नंतर यांची आठवण कोणी काढणार नसल्याच्या चिंतेतून मैदानाला स्वताचे नाव
पुणे: अहमदाबाद येथील ‘सरदार वल्लभभाई पटेल’ या मैदानाचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडीयम’ असे करण्यात आले आहे. यानंतर विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मैदानाचे नाव बदलल्याने टीका केली आहे. “या देशाला काय नेता मिळाला आहे. लोक यांना विसरून जातील याची चिंता आहे. यांचा लोकांवर विश्वास नाही की मृत्यू नंतर यांची आठवण कोणी काढणार की नाही. यामुळेच मैदानाचे पहिले नाव बदलले” अशी टिका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
क्या नेता मिला है देश को। इनको चिंता है कहीं लोग इन्हें भूल न जाए। इन्हें लोगों पर भरोसा नही है कि गुजर जाने के बाद कोई इन्हे याद रखेगा या नही। इसीलिए मरने से पहले स्टेडियम अपने नाम पर करा लिया।#MoteraCricketStadium
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 24, 2021
या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करून टिका केली आहे. जगातील सर्वात मोठ क्रिकेट स्टेडीयम ‘सरदार पटेल मैदानाचे’ बुधवारी उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी कसोटी मालिका या मैदानात सुरु आहे. तसेच या स्टेडीयम ची क्षमता १ लाख ३२ हजार प्रेक्षकसंख्येची आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
आंबेडकर यांच्या बरोबरच कॉंग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा टीका केली आहे.