गृहविभागाचा कारभार स्वीकारल्या नंतर दिलीप वळसे पाटील म्हणाले…

मुंबई: सध्याचा काळ अवघड आणि चॅलेजिंग आहे. परंतु, गृहमंत्री पदाची जबाबदारी पार पडण्याच काम करेन. प्रशासकीय कामात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही अशी ग्वाही राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
दिलीप वळसे पाटील यांनी आज गृहविभाचा कार्यभार स्विकारला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांचे आभार मानले.
सध्याचा काळ अवघड आणि चॅलेजिंग आहे. कोरोनामुळे पोलीस दल रस्त्यावर आहे. पोलीस दलाच काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच आहे. तरीही कोरोनामुळे त्यांना रस्त्यावर ड्युटी करावी लागत आहे. या महिन्यात मोठे सण आहेत. पोलिसांना काम करणे चॅलेजिंग असणार आहे अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न राहिली. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप माझ्या बाजूने राहणार नाही. महाराष्ट्राला पारदर्शक कारभार देणार असल्याची ग्वाही दिलीप वळसे-पाटील यांनी गृहविभागाचा कारभार हाती घेतांना दिली.
उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या जनहित याचिकेवर जो निर्णय दिला आहे त्याला राज्यसरकार सर्वोच्य न्यायालयात आव्हान देणारं असल्याचे सांगत न्यायालयने दिलेल्या आदेशाला सहकार्य करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.