आव्हाडांच्या अटकेवर आदित्य ठाकरे म्हणाले, ”आम्ही पण जेलमध्ये”

आदित्य ठाकरे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

ठाण्यातल्या विवीयाना मॉलमधल्या चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आलीये. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरु केलाय.

आव्हाडांना अटक झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी या अटकेचं स्वागत केलंय. ‘एखादी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी चुकीचं दाखवते, याला विरोध केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना अटक होत असेल, तर मी या अटकेचं मनापासून स्वागत करते, अशी मार्मिक प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळेंनी दिलीये.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिलीये. ‘जितेंद्र आव्हाड यांनी बरोबर केलं आहे. त्यांच्याबरोबर आम्ही पण जेलमध्ये जाण्यास तयार आहोत’, असं म्हणत ठाकरेंनी आव्हाडांचं समर्थन केलंय.

शो बंद पाडत असताना आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडून प्रेक्षकांना मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय. त्यानुसार ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात १४१, १४३, १४६, १४९, ३२३, ५०४, अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ही घटना घडताच भाजप, मनसेकडून आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. आव्हाडांना अटक होताच असून मनसेकडून पोलीस कारवाईचं स्वागत करण्यात आलंय.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *