|

पुन्हा एकदा भाजपकडून आदित्य ठाकरे लक्ष?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

वरुण सरदेसाई यांच्या आडून निशाणा साधण्याचा प्रयत्न?   

मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले जात असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी नितेश राणे पत्रकार परिषद घेऊन निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे यांनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून १५० कोटी घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच सट्टेबाजांकडून पैसे घेतल्यानंतर वाझे यांना फोन करून वरुण सरदेसाई यांनी ते पैसे मागून घेतले असाही आरोप नितेश राणे यांनी केला. वाझे आणि वरुण सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करावी अशी मागणी केली. यानंतर पुन्हा एकदा भाजपकडून आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेता सुशांत सिंग प्रकरणात अश्याच प्रकारे आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात आले होते. वाझे प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर थेट आरोप न करता त्यांच्या जवळील वरुण सरदेसाई यांचे नाव घेण्यात आले आहे. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे प्रमुख असणाऱ्या युवा सेनेचे सरचिटणीस आहे. त्यांना काही महिन्यापूर्वी x दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्यानंतर मोठा वाद झाला होता.

कोण आहेत वरुण सरदेसाई

आदित्य ठाकरे यांच्या जवळील म्हणून वरुण सरदेसाई यांचे नाव घेण्यात येते. अरुण सरदेसाई यांचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. सिव्हील इंजिनियरची पदवी मिळविली आहे. ते आदित्य यांचे मावस भाऊ आहेत. त्यांच्याकडे युवा सेनेचे सरचिटणीस पद आहे. त्यांना x सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांच्या बरोबर ते सावली सारखे राहतात. आदित्य यांचा बरोबर राजकारणात प्रवेश केला आहे. २०१९ निवडणुकीपूर्वी आदित्य सवांद नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात आला होता. याची सर्व जबाबदारी वरून यांच्यावर होती. आदित्य ठाकरे यांनी पहिली निवडणूक वरळी येथून लढली होती याची जबाबदारी सुद्धा वरुण कडे होती. शिवसेना पक्षसंघटनेत त्यांचा बोलबाला आहे अस बोलल जात. सोशल मिडीयावर आपली भूमिका नेहमी मांडत असतात. ठाकरे कुटुंबियांना अधिकृतपणे जे बोलता येत नाही ते वरुण सरदेसाई बोलतात असे बोलण्यात येते.  


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *