पोलिसांवर हल्ल्याप्रकरणी कारवाई होणार-अशोक चव्हाण
नांदेड: नांदेडच्या सचखंड श्री हुजुर साहेब गुरुद्वाराच्या परिसरात पोलिसांवर हल्ला करण्यात आला. यात पोलीस कर्मचाऱ्यासह काही जण जखमी झाले आहे. याबाबत नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “नांदेड मधील घडलेला प्रकार धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासन याची चौकशी करून योग्य ती कारवाई करेल असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता नांदेड जिल्ह्यात ४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे होळी नंतर निघणाऱ्या शीख समाजाच्या होला मोहल्ला मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. त्याबाबत गुरुद्वारा प्रबंधक समितीला सूचना केल्या होत्या. तेव्हा त्यांनी हा कार्यक्रम गुरुद्वारा मध्ये करू असच आश्वासन दिले होते. पण सायंकाळी ४ वाजल्यानंतर निशाण साहिब गुरुद्वारा बाहेर आणलं. तेव्हा ३०० ते ४०० तरुणांनी बॅरीकेट तोडण्याचे प्रमोद कुमार शेवाळे यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आता पर्यंत २० जणांना अटक करण्यात आली असून ४०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात ४ पोलीस कर्मचारी आणि इतर १० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहे. तर पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर नांदेडचे पालकमंत्री तथा सार्जनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे या घटनेनंतर नांदेड मध्ये तळ ठोकून बसले होते. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, मिरवणूक काढण्यात येणार नाही ठरविण्यात आले होते. तरीदेखील काही जणांनी बॅरीकेट तोडली. बाहेर निघालेल्यानी पोलिसांवर निर्घुण हल्ला केला. त्यातील काही पोलीस रुग्णालयात दाखल आहे. कालची घटना निंदनीय आणि चुकीची आहे. ज्या प्रकारे पोलिसांवर तलवारीने हल्ले झाले, ते भयानक आहे. एसपी, आयजी, जिल्हाधिकारी यांच्या बैठका घेतल्या चौकशी नंतर कारण स्पष्ट होईल, त्यानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.