|

स्वपक्षाच्या आमदाराने राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याने ‘आप’ ची कोंडी!

AAP's dilemma due to self-proclaimed MLA's demand for President's rule!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रंचड हाहाकार सुरू आहे. देशाच्या राजधानीतच रुग्णांसाठी औषधं, बेड, वेंटिलेटर, ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत हतबल असलेले विधीमंडळाचे सर्वात जेष्ठ आमदार शोएब इकबाल यांनी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावावी अशी विनंती दिल्ली उच्च न्यायालयाला केली आहे.
दिल्लीतील कोरोना परिस्थित अत्यंत बिकट झाली आहे. देशाची राजधानी असूनही दिल्लीत कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. अपुऱ्या सुविधांअभावी कित्येकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील आम आदमी पार्टीचे जेष्ठ आमदार शोएब इकबाल यांनी हतबल प्रतिक्रिया दिली आहे.
मी दिल्लीत ६ टर्म आमदार राहिलो आहे. परंतु आज आमदार असल्याचा अभिमान नाही तर लाज वाटत आहे. कारण मी माझ्या लोकांसाठी इच्छा असूनही काहीही करू शकत नाहीये. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाला विनंती करतो की, त्यांनी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी. दिल्ली अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. परिस्थितीत सुधार झाला नाही तर दिल्लीच्या रस्त्यांवर मृतांचे खच पडतील. असे इकबाल यांनी म्हटले आहे.
अगोदरच केंद्र सरकारने विशेष कायद्याद्वारे बहुतांश अधिकार हे नायब राज्यपालांना देऊन ठेवले आहेत. त्यामध्ये आता स्वपक्षाच्या आमदाराने राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याने ‘आप’ची आणखीनच कोंडी झाली आहे.

शोएब इक्बाल काय म्हणाले?
दिल्लीत कोणतेच काम धड होत नाही. लोकांचं म्हणणं ऐकायला दिल्लीत कोणीही नाही. दिल्लीत बेड, ऑक्सिजन किंवा औषधं काहीच नाही. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. दिल्लीत वेळीच राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही तर रस्त्यांवर मृतदेहांचे सडे पडतील


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *