आम आदमी पार्टी उतरणार कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत

कोल्हापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक होणार आहे. यासाठी 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
काँग्रेसने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तशी माहिती काँग्रेसने ट्वीट करत दिली आहे.
दरम्यान, काँग्रेस ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे असले तरी भाजप कोल्हापूर उत्तरमधून सत्यजित कदम यांना अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
दोन्ही पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत होणार होईल, अशी चिन्हे होती. मात्र, आम आदमी पार्टीने या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा पाऊल टाकण्याच्या बेत आखल्याचे दिसते.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक ‘आप’ संपूर्ण ताकदीने लढणार असून ‘आप’कडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे’, अशी माहिती आपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली आहे.
आताच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आपचा पंजाबमध्ये झंझावात पाहायला मिळाला. तर गोव्यातही आपने आपले खाते उघडले आहे. येत्या काही दिवसांत आप देशभर निवडणुका लढणार आहे. अशातच आपने महाराष्ट्रात पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
ताज्या बातम्या –
सरकार कोणत्या निकषांवर चित्रपटांना करमुक्त करते ? झुंडच्या निर्मात्यांचा जळजळीत सवाल
सत्य दडपून इतिहास कसा दाखवणार ? कश्मीर बाबतचे खरे सत्य अद्याप पडद्यावर यायचे आहे – संजय राऊत
मुहूर्त ठरला ; ‘या’ तारखेला घेणार प्रमोद सावंत शपथ