|

दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीचा बोलबाला

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

दिल्ली: महानगरपालिकेच्या पाच मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाला चार जागा तर कॉंग्रेसला १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपा एकही जागा न मिळविता आली नाही.

दिल्ली महानगरपालिकेच्या ५ जागेसाठी २८ फेब्रुवारीला पोटनिवडणुक झाली होती. त्रीलोकापुरी, शालीमार बाग वार्ड, रोहिणी-सी, कल्याणपुरी या चार जागेवर आप जिंकली आहे. तर कॉंग्रेसने शालीमार बाग उत्तरच्या जागेवर विजय मिळविला आहे.

२०२२ मध्ये दिल्ली महानगरपालिकेच्या २७२ मतदारसंघात निवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीकडे सेमी फायनल म्हणून पाहण्यात येत आहे.

पोटनिवडणुकीतील दिल्लीचे उमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्वीट केले आहे. यात त्यांनी भाजपच्या कामामुळे दिल्लीतील जनता दुःखी आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

त्रीलोकापुरीतून आपचे विजय कुमार निवडून आले आहेत. शालीमार बाग वार्ड मधून आपच्या सुनिता मिश्रा निवडून आल्या आहेत. रोहिणी-सीतून आपचे रामचंद्र हे निवडून आले आहेत. कल्याणपुरीतून धीरेंद्र कुमार हे जिंकून आले आहे. तर चौहान बांगर या मतदार संघातून कॉंग्रेसचे झुबीर अहमद निवडून आले आहेत.  


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *