‘विरार मध्ये आग लागल्याची घटना नॅशनल न्यूज नाही; संवेदनशील मंत्र्याचे असंवेदनशील वक्तव्य’

मुंबई : विरार मधील वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केले. ही काही नॅशनल न्यूज (घटना) नाही राज्य सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे म्हटले आहे. ‘नॅशनल न्यूज नाही’ अस वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
विरारच्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माध्यमांनी टोपे यांना विचारले. त्यावेळी त्यांनी राज्याच्या गरजाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठ्याबाबत सुद्धा बोलणी सुरु आहे. आजच्या घटनेची माहिती देण्यात येईल. ही नॅशनल न्यूज नाही. त्यामुळे आम्ही राज्य सरकारच्या वतीने सर्व काही मदत करू. मृताच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाख आणि महापालिका ५ लाख अशी १० लाखांची मदत करण्यात येईल असे टोपे यांनी सांगितले. त्याचबरोबर फायर, स्ट्रक्चरल व इलेक्ट्रिक ऑडीट हे सर्व इमारतींना सक्तीचे करण्यात येईल. याची अमलबजावणी झाली नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल. आजच्या दुर्घटनेची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल अस राजेश टोपे यांनी सांगितले.
विरार मधील रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो अस आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
#WATCH Virar fire incident, not national news…says Maharashtra Health Minister Rajesh Tope
— ANI (@ANI) April 23, 2021
13 people have lost their lives in a fire incident at Vijay Vallabh COVID care hospital in Maharashtra's Virar pic.twitter.com/hNZEHIbnLp