सुएझ कालव्यातील वाहतूक ठप्प करणाऱ्या जहाजाला तब्बल ‘एवढ्या’ कोटींची दंड

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

काहिरा: ‘एव्हर गिव्हन’ या जहाजामुळे इजिप्तच्या सुएझ कालव्यातील जलवाहतूक सहा दिवस ठप्प झाली होती. या जहाजावर करवाई करण्यात येणार आहे. तसेच या जहाजावर जप्तीची कारवाई सुद्धा होणार असून तब्बल ९०० दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास ६ हजार ५४० कोटी रुपयांचा दंड होणार आहे.

सुएज कालव्यातून जागतिक व्यापारापैकी या कालव्यातून १२ टक्के व्यापार होते, यामुळे या सहा दिवसात मोठे नुकसान झाले आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर जहाज ताब्यात घेण्याची तयारी करण्यात येणार आहे. सुएझ कालव्यातील वाहतूक ठप्प होऊन सुएझ कालवा प्राधिकरणाचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. सुएझ कालवा प्राधिकरणाची कारवाई अतिशय चुकीची असल्याचे बीएसएम यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. सध्या ‘एव्हर गिव्हन’ जहाज इजिप्तच्या ग्रेट बिटर लेकमध्ये आहे. सुएझ कालवा प्राधिकरण आणि जहाज कंपनीमध्ये तोडगा निघेपर्यंत हे जहाज तिथेच राहणार आहे. जहाजावरील सर्व कमर्चारी सुखरूप असल्याचे माहिती बीएसएम यांनी दिली आहे. बीएसएम सतत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. क्रूमध्ये २५ भारतीयांचा समावेश आहे. ‘एव्हर गिव्हन’ हे मालवाहू जहाज वादळात भटकाल्याने सुएझ कालव्यात अटकले होते. यामुळे दोन्ही दिशेची वाहतूक पुर्ण ठप्प झाली होती. सहाव्या दिवशी अखेर जहाजाची सुटका करण्यात आली होती.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *