भिडे गुरुजींकडून काही धारकरी अवैध काम करून घेतात: नितीन चौघुले
सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेत फुट पडली आहे. काही दिवसांपूर्वी या संघटनेतून नितीन चौघुले यांचे निलंबन करण्यात आले आहे. ”भिडे गुरुजींचे नाव घेवून काही धारकरी अवैध धंदे करतात, असा गंभीर आरोप नितीन यांनी केला आहे. दरम्यान, तडीपार वाळू तस्कर, लाॅटरी वाले गुरुजीना घेवून अधिकाऱ्याकडे घेवून जातात व अवैध कामे मंजूर करून घेतात, असा आरोप नितीन चौघुले यांनी केला आहे.
दरम्यान, संघटनेतील काही व्यक्तींमुळे माझ्यावर नाहक आरोप झाले आहेत. या लोकांमुळे गुरुजींच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाले आहेत, असे चौघुले म्हणाले.
काही दिवसांपूर्वी नितीन चौघुले यांना कार्यवाह पदावरून हटवण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी आपली वेगळी संस्था काढली आहे. कुठलेही कारण नसताना ह्या पदावरून मला निलंबित करण्यात आले आहे, असे नितीन म्हणाले. त्या संदर्भात डेक्कन येथे चौघुले यांचे समर्थक आणि शिवभक्तांचा मेळावा पार पडला.