Sunday, September 25, 2022
HomeZP ते मंत्रालयएका मोर्चाने राज आणि उद्धव यांच्यात कडव्या स्पर्धेची ठिणगी पडली...

एका मोर्चाने राज आणि उद्धव यांच्यात कडव्या स्पर्धेची ठिणगी पडली…

छगन भुजबळ यांच्या रूपाने शिवसेनेतून पहिला मोठा नेता बाहेत पडला. पुढे २००५ साली नारायण राणे कॉंग्रेसवासी झाले. हे दोन धक्के पचवताच शिवसेनेला तिसरा धक्का राज यांच्या रूपाने बसला. हा धक्का ठाकरेंकडून ठाकरेंना बसलेला असल्याने याचे दूरगामी परिणामी शिवसेनेच्या राजकारणावर नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणावर पडले.

राज यांचे शिवसेना सोडण्याचे कारण सर्वश्रुत आहे. उध्दव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज यांच्या वर्चस्वाला दिलेले आव्हान आणि त्यातून सुरु झालेला कलगीतुरा यांमुळे राज यांनी शिवसेना सोडून नवनिर्माणाचे अस्त्र पेलले.

वर्चस्वाची लढाई हेच राज आणि उद्धव यांच्या वादाचे कारण ठरले.

पण त्याअगोदर या दोघांमध्ये स्पर्धेची सुरुवात नेमकी कुठून झाली? याची माहिती आपल्याला नसते.

डिसेंबर १९९१ ची गोष्ट. राज यांनी मुंबईत विधिमंडळावर बेरोजगार तरुणांचा विराट मोर्चा काढला. मुंबईत एक मोर्चा काढून राज थांबले नाहीत ; तर त्यांनी या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी व मोर्चाला अधिकचा पाठींबा मिळविण्यासाठी राज्यभर दौरे सुरु केले.

त्यावेळी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होते. अधिवेशनामुळे सर्वांचे लक्ष नागपूरकडे लागले असल्याने राज यांनी नागपुरात असाच मोर्चा काढायचे ठरविले. शिवसेनेकडून जोरदार तयारीही करण्यात आली. मुंबईप्रमाणेच याही मोर्चाला पाठींबा मिळणार, अशी शक्यता दिसू लागली.

ठरल्यानुसार, राज नागपुरात पोहोचले. तेव्हा त्यांचा मुक्काम हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये होता. त्यावेळी मातोश्रीवरून एक फोन आला. ‘मोर्चा नंतरच्या सार्वजनिक सभेत उद्धव यांनाही बोलू द्यावे,’ अशी सूचना करण्यात आली.

मातोश्रीचा आदेश कोण डावलणार ? त्यामुळे राज ठाकरे ‘हो’ बोलले. पण यामुळेच राज दुखावले. कसलेही योगदान नसताना उद्धव यांना श्रेय दिले जात असल्याचे त्यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली.

ठरल्याप्रमाणे, दुसऱ्या दिवशी मोर्चा निघाला. जवळपास पन्नास हजार लोकांनी मोर्चाला येत पाठींबा दर्शिविला होता. राज आणि उद्धव दोघांनी या मोर्चाला संबोधित केले. त्यानंतर शिवसेना नेत्यांसोबत राज मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना भेटले. निवेदन सादर केले.

उद्धव यांचे पहिले सार्वजनिक भाषण म्हणून त्यांच्या नागपुरातील सभेकडे पहिले जाते. मात्र, उद्धव यांच्यापेक्षा राज यांचे भाषण तडफदार होते त्याला आक्रमकतेची जोड होती. तर उद्धव यांचे भाषण त्यांच्या मावळ स्वभावासारखे होते. (जेष्ठ पत्रकार व शिवसेना खासदार नारायण आठवले यांनी याबाबत माहिती दिली आहे. )

तसेच राज यांचे निकटचे सहकरी सांगतात, मुंबईत झालेल्या मोर्चानंतरच राज आणि उद्धव यांच्यातील कडवट स्पर्धेला सुरुवात झाली होती. १९९१ साली दोघांमधल्या स्पर्धेने राजकीय संघर्षाला जन्म दिला.

१९९६ मध्ये सुरु झालेल्या या संघर्षाला २००५ मध्ये मोठे वळण आले. पुढे ‘माझा वाद विठ्ठलाशी नाहीये तर त्यांच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे’, असे म्हणत राज यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला.

आणखी वाचा :

वाढदिवस विशेष : राज काल आणि आज

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments