मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचार संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह ३३ जणांवर अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे, परमबीर सिंग सह इतर अधिकाऱ्यांच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे.
या घटनेसंदर्भात ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासाकरता वर्ग करण्यात आला आहे. मात्र यानंतर परमबीर यांच्यासह ३३ जणांविरोधात अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी पोलीस महासंचालाकाकडे केली आहे. त्याचप्रमाणे परमबीर सिंग यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सुद्धा पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्याविरुद्धची ही अशाप्रकारची दुसरी तक्रार आहे. याआधी मुंबई पोलीस दलातील अधिकारी अनुप डांगे यांनीही तक्रार करून परमबीर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
Maharashtra Police has filed FIR against former Mumbai police commissioner Param Bir Singh following corruption allegations by a police inspector, a senior official says
— Press Trust of India (@PTI_News) April 29, 2021