प्रेमात आईचा अडथळा, मुलाने केला आईचा खून

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे: प्रेम आंधळं असल्याचं म्हटलं जातं. कधी प्रेमासाठी घरदार सोडतात, तर कधी आपल्याच जवळच्या लोकांशी भांडतात. प्रेमात लोकं वाट्टेल ते करतात त्यामुळेच कदाचित प्रेम हे आंधळं असतं असं म्हटलं जात असावं. प्रेमासाठी मुलाने चक्क आपल्या आईचा खून केल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील लोणीकंद मध्ये समोर आली आहे.   

लोणीकंद पोलिसांना माने वस्तीत एका महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली होती. महिलेची ओळख पटल्यानंतर तिच्या मुलाची चौकशी करण्यात आली आणि उसन्या पैशांसाठी एका व्यक्तीने आईचा खून केला असल्याचं त्याने सांगितलं. तांत्रिक गोष्टींच्या आधारे शोध घेतल्यांनंतर मुलानेच आईचा खून केल्याचं समोर आलं. सतत होणार वाद व प्रेमात अडसर ठरत असल्यानं मुलाने आणि त्याच्या प्रेयसीने खून केल्याचे समोर आले.  

सुशीला राम वंजारी ( वय ३८,रा. माने वस्ती, वढू खुर्द ) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. मुलगा विशाल राम वंजारी (वय १९) याला अटक करण्यात आलीये आणि त्याची प्रेयसी नॅन्सी गॅब्रिअल डोंगरे ( वय २६) हिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

विशाल घरातून पैसे चोरत असल्यामुळे आईसोबत त्याची सतत भांडणं होत होती. त्याच्या आणि त्याच्या प्रेयसीच्या प्रेमातही आई अडसर ठरत होती. ९ मार्चला दुपारी विशाल आणि आई मध्ये भांडण झालं आणि विशालने आपल्या प्रेयसी सोबत मिळून आईच्या गळ्यावर वार करून खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *