पुणे विभागातील 9 लाख 80 हजार 172 कोरोना बाधित रुग्ण ‘कोरोनामुक्त’ : विभागीय आयुक्त सौरभ राव

9 lakh 80 thousand 172 corona infected patients in Pune division 'coronamukta': Divisional Commissioner Saurabh Rao
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे : पुणे विभागातील 9 लाख 80 हजार 172 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 लाख 50 हजार 528 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 48 हजार 387 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 21 हजार 969 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 17 हजार 633 रुग्णांपैकी 7 लाख 10 हजार 784 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 94 हजार 179 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.93 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 98 हजार 532 रुग्णांपैकी 77 हजार 364 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 921 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 95 हजार 670 रुग्णांपैकी 78 हजार 409 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 593 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 668 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 73 हजार 90 रुग्णांपैकी 58 हजार 440 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 444 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 65 हजार 603 रुग्णांपैकी 55 हजार 175 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 250 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 15 हजार 433 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 413, सातारा जिल्ह्यात 1 हजार 810, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 878, सांगली जिल्ह्यात 1 हजार 363 तर कोल्हापूर जिल्ह्यात 969 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 15 हजार 859 आहे. पुणे जिल्हयामध्ये 11 हजार 302, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 764, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 306, सांगली जिल्हयामध्ये 925 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 562 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 66 लाख 32 हजार 943 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 11 लाख 50 हजार 528 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *