पुणे विभागात ९ लाख ६४ हजार ३१३ कोरोना बाधित रुग्ण ‘कोरोनामुक्त’ : विभागीय आयुक्त सौरभ राव

9 lakh 64 thousand 313 corona infected patients 'coronamukta' in Pune division: Divisional Commissioner Saurabh Rao
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे : पुणे विभागातील 9 लाख 64 हजार 313 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 लाख 35 हजार 95 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 49 हजार 132 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 21 हजार 650 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.95 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 8 हजार 220 रुग्णांपैकी 6 लाख 99 हजार 482 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 96 हजार 222आहे. कोरोनाबाधित एकूण 12 हजार 516 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.55 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 96 हजार 722 रुग्णांपैकी 75 हजार 600 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 931 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 93 हजार 792 रुग्णांपैकी 77 हजार 103 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 59 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 630 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 71 हजार 727 रुग्णांपैकी 57 हजार 515 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 45 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 64 हजार 634 रुग्णांपैकी 54 हजार 613 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 875 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 14 हजार 156 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 8 हजार 988, सातारा जिल्ह्यात 1 हजार 666, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 390, सांगली जिल्ह्यात 1 हजार 395 तर कोल्हापूर जिल्ह्यात 717 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 15 हजार 917 आहे. पुणे जिल्हयामध्ये 11 हजार 324, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 910, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 257, सांगली जिल्हयामध्ये 870 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 556 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 65 लाख 56 हजार 331 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 11 लाख 35 हजार 95 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *