पुणे विभागात ९ लाख ४८ हजार ३९६ कोरोना बाधित रुग्ण बरे : विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : पुणे विभागातील ९ लाख ४८ हजार ३९६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ११ लाख २० हजार ९३९ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या १ लाख ५१ हजार १३० इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण २१ हजार ४१३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण १.९१ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ८४.६१ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण ७ लाख ९९ हजार २३२ रुग्णांपैकी ६ लाख ८८ हजार १५८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण ९८ हजार ७०९आहे. कोरोनाबाधित एकूण १२ हजार ३६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण १.५५ टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ८६.१० टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण ९५ हजार ५६ रुग्णांपैकी ७३ हजार ६९० रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या १९ हजार १९३ आहेत. कोरोनाबाधित एकूण २ हजार १७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण ९२ हजार ४०२ रुग्णांपैकी ७५ हजार ८४६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या १३ हजार ९३५ आहेत. कोरोनाबाधित एकूण २ हजार ६२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण ७० हजार ३३२ रुग्णांपैकी ५६ हजार ६४५ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ११ हजार ५४४ आहेत. कोरोनाबाधित एकूण २ हजार १४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 63 हजार 917 रुग्णांपैकी 54 हजार 57 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 749 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 11 हजार 4 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 6 हजार 46, सातारा जिल्ह्यात 1 हजार 437, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 537, सांगली जिल्ह्यात 1 हजार 141 तर कोल्हापूर जिल्ह्यात 843 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 834 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 823, सातारा जिल्हयामध्ये 338, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 327, सांगली जिल्हयामध्ये 935 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 411 रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 64 लाख 89 हजार 254 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 11 लाख 20 हजार 939 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.