राज्यात आढळून आले तब्बल ६७ हजार १२३ नवे रुग्ण; तर ४१९ जणांचा मृत्यू
मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. सध्या महाराष्ट्रात दररोज 60 हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढविणारी बाब आहे.
काल तब्बल 67 हजार 123 कोरोना बाधित आढळून आले आहे. 15 एप्रिलच्या तुलनेत तब्बल 5 हजार अधिक रुग्ण वाढले आहेत. तर 419 जणांचा मृत्यू कोरोना झाला आहे.
दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. राज्यातील मृतांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर आज दिवसभरात 56 हजार 783 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे
पुण्यात काल 6 हजार 6 नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात ५ हजार ६०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. करोनाबाधीत ७५ रुग्णांचा मृत्यू झाला त्यातील २१ रूग्ण पुण्याबाहेरील होते. पुण्यात १हजार २३६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात ५४ हजार ९६७ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत