Tuesday, October 4, 2022
Homeविश्लेषणात्मक तडकागोविंदांना 5 टक्के आरक्षण : सामाजिक, विद्यार्थी चळवळ नाराज का आहे ?

गोविंदांना 5 टक्के आरक्षण : सामाजिक, विद्यार्थी चळवळ नाराज का आहे ?

एकीकडे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक आहेत. ओला दुष्काळ मागणीवर विरोधक सरकारला घेरत आहेत. त्यातच दहीहंडीमध्ये गोविंदा म्हणून सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे सरकावर टीका केली जात असून सामाजिक व विद्यार्थी चळवळीतून या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

काल विधानसभेत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला असल्याचे सांगत गोविंदांना राज्य सरकारच्या खेळाडूंसाठी असलेल्या 5 टक्के आरक्षणाचा फायदा होणार असल्याचेही सांगितले. तसेच गोविंदांसाठी अनेक फायदेशीर निर्णय घेतले जाणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदा व त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती.

मृत व जखमी गोविंदांसाठी सहाय्य

यानुसार गोविंदा पथकातील खेळाडूचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल.

दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल.

दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.

हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष 2022) लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल.

या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

अटी व शर्ती

हे आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी पुढील अटी व शर्ती लागू आहेत – दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे, न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे.

गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी, त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे. मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.

गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तत्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे.

मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे अहवाल देणे आवश्यक आहे.

सामाजिक व विद्यार्थी चळवळीतून विरोध

सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणतात,

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश मुख्य सरचीटणीस आकाश झांबरे पाटील म्हणतात,

युवासेनेच्या शर्मिला येवेले म्हणतात,

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणतात,

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रदेश सरचिटणीस केतनकुमार पाटील यांनीही आपली भूमिका मांडली. ते म्हणतात,

विविध स्तरातून या निर्णयाला विरोध केला जात आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रातुन सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने घोषणाबाजी केली खरी ; पण त्यासाठी संरचना स्पष्ट न केल्याने संभ्रम निर्णय झाल्याचे पाहायला मिळते.

अधिक वाचा :

एखाद्या राज्यात डाव्यांची सत्ता येताच, पुरोगामी मंडळींना हायसे का वाटते ?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments