चिमुकल्या अयांश गुप्ताच्या उपचारासाठी हवेत १६ कोटी !

शिक्षण क्षेत्रातील अनेकांचे मदतीचे आवाहन
पुणे : स्पायनल मस्क्यूलर रेट्रोफी नावाच्या दुर्मिळ आजाराने पीडित अयांश गुप्ता या हैद्राबाद मधील लहान मुलाला उपचार करण्यासाठी १६ कोटी रुपयांची गरज असून क्राउड फंडिंग द्वारे त्याला मदत करावी,असे आवाहन पुण्याच्या शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी केले आहे.
कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी चे संस्थापक राकेश मित्तल,संस्कार पब्लिक स्कुल च्या मुख्याध्यापक सिद्धी मित्तल यांनी रविवारी पत्रकाद्वारे मदतीचे आवाहन केले आहे.
हैदराबादमध्ये दोन वर्षांच्या या चिमुकल्याला स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारावरील उपचारासाठी संपूर्ण देशात एकच औषध उपलब्ध आहे आणि या औषधाची किंमत तब्बल १६ कोटी रुपये इतकी आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम जमा करणं कठीण आहे.तरीही त्यांनी आजपर्यंत ५ कोटी रुपये उभे केले आहेत.सोशल मीडियावरून देखील देशातील अनेकांनी मदतीचे आवाहन केले असून मदतही पाठवली आहे,असे राकेश मित्तल आणि सिद्धी मित्तल यांनी सांगितले.
Account number:
700701717157379
Account name: Ayaansh Gupta
IFSC code : YESB0CMSNOC(The digit after B is Zero and the letter after N is O for Orange)
For UPI Transaction: supportayaansh1@yesbankltd
या अकाउंट मध्ये मदत पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.