राज्यात १५ दिवसांचे लॉकडाऊन? मुख्यमंत्री उद्या घोषणा करणार

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, तरीही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कोरोनाची साखळी मोडण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करणे महत्वाचे असल्याचे सांगण्यात येत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत उद्या घोषणा करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. यानंतर राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी लसीकरण, रेमडेसिवीर, ऑक्सिजन बाबत माहिती दिली.
सध्या राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. मात्र, तरीही नागरिक रस्त्यावर फिरतांना दिसत आहे. लॉकडाऊन लावला तर अशा नागरिकांना जरब बसले असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या संध्याकाळी ८ वाजता याची घोषणा करणार असल्याचे सांगितले.