उद्या पासून राज्यात १५ दिवसांची संचारबंदी

मुंबई : कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता उद्या पासून राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रेक द चैन साठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. १ महिन्यासा याबाबतची कल्पना दिली होती. अनावश्यक काम नसेल तर बाहेर पडू नका अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. ना इलाज म्हणून हे करावी लागत आहे. साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. प्राण वाचविणे हेच मागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
भाषणातील महत्वाचे मुद्दे
-राज्यात उद्यापासून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
-सकाळी ७ ते रात्री ८ वाजता अत्यावशक सेवा सुरु राहणार
-बस, ट्रेन बंद राहणार नाही. ही सेवा केवळ अत्यावशक सेवादेणाऱ्या कर्मचाऱ्यासाठीच सुरु राहणार.
– हॉटेल, बार बंदच राहणार, होम डिलिवरी सुरु राहिली.
– ७ कोटी नागरिकांना ३ किलो गहू, १ किलो तांदूळ १ महिना मोफत धान्य देणारं आहे.
– शिवभोजन थाळी १ महिनासाठी मोफत देण्यात आहे.
-१२ लाख रिक्षा चालकांना प्रत्येकी दीड हजार देणारं
-संजय गांधी निराधार, श्रावण बाल योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजने अंतर्गत ३५ लाख नागरिकांना १ हजार रुपये आगावू देणारं
-१०० टक्के वापर ऑक्सिजन कोविड रुग्णासाठी वापरत आहे. रेमडीसिवीरची मागणी अचानक वाढली. औषध तयार व्हायला १५ दिवस लागता. केंद्र सरकारला परिस्थिती सांगितली आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी मागितली होती. ईशान्य, पश्चिम बंगाल मधून ऑक्सिजन रस्त्या मागे आणणे सोपे नाही. लष्करची मदत घेवुन हवाई दला मार्फत ऑक्सिजन आणता येईल का अशी विचारणा केंद्र सरकार कडे केली आहे.
-मार्च महिन्यात लघु आणि मधयम उद्योगासाठी GST परताव्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढ द्यावी.
-इतर नैसर्गिक आपत्ती जे निकष लावतो. ज्यांची रोजी रोटी केली आहे त्यांना व्यक्तिगत मदत करावी.
-राज्यात लसीकरण वाढवावे लागणार आहे. ब्रिटनने लॉकडाऊन करून लसीकरण केले. मृत्यू दर कमी केला आहे. त्याच मार्गाने आपल्याला जावे लागणर आहे. कोरोनाची ही प्रचंड मोठी लाट आहे. किती वाढतील हे सांगता येत नाही.
– मागच्या वेळी राज्यात कोरोनाची मोठी लाट येवू दिली नाही. आपण कॉविड वर नियंत्रण मिळवून दाखविली आहे.
-आरोग्य सुविधा तोकडी पडतांना दिसत आहे. हे युद्ध आपण जिंकणार आहे. ही लाट भीतीदायक आहे. ऑक्सिजन, औषध व्यवस्था वाढविण्याची गरज आहे.
-उपचार करण्यासाठी डॉक्टर मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निवृत्त आरोग्य कर्मचार्यांनी नैसर्गिक आपत्तीत समोर या
-साध्य 50 हजारांची रेमडीसीवर इंजेकशन दिवसाला लागत आहे. साखळी तुटली नाही तर अवघड परीस्थिति निर्माण होईल.
– सुविधेवर भार येत आहे. परीक्षा पुढे ढकल्या आहे. ऑक्सिजन कमी पडत आहेत.