|

दहावीची परीक्षा रद्द; शिक्षण मंत्र्याची घोषणा

How to get the result of X? Read detailed
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. यापरीक्षा अगोदर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरीस बारावीच्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून याची माहिती दिली. दहावीच्या विद्यार्थांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकाल कसा तयार करायचा याबाबतचे निकष लवकर जाहीर करण्यात येतील असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *