१०० कोटी प्रकरण; अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल. सीबीआयची १० ठिकाणी छापेमारी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला असून त्यांच्या घरावर देखील छापा मारला आहे. यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत.
शंभर कोटी वसुली प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने तपास सुरू केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी पूर्ण झाली आहे. सीबीआयने ११ तास चौकशी केली होती. सीबीआयने एक अहवाल तयार केला असून तो अद्याप कोर्टात दाखल करण्यात आला नाही. अहवाल दाखल करण्यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० ठिकाणी छापेमारी
दरम्यान सीबीआयने अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशिरा छापेमारी सुरू केली होती. ती पहाटे पर्यंत सुरू होती.
१०० कोटी वसुलीचे टार्गेट
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपयांची वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने या आरोपांची दखल घेवून सीबीआयने १५ दिवसात चौकशी करावी असा आदेश दिला होता.