पुणे विभागातील 10 लाख 7 हजार 934 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त : विभागीय आयुक्त सौरभ राव

10 lakh 65 thousand 545 corona patients in Pune division 'corona free'
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे : पुणे विभागातील 10 लाख 7 हजार 934 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 लाख 86 हजार 577 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 56 हजार 92 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 22 हजार 551 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.94 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 39 हजार 265 रुग्णांपैकी 7 लाख 29 हजार 943 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 96 हजार 337 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 हजार 985 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.97 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 3 हजार 281 रुग्णांपैकी 80 हजार 706 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 20 हजार 284 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 291 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 378 रुग्णांपैकी 80 हजार 662 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 964 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 75 हजार 678 रुग्णांपैकी 60 हजार 264 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 148 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 266 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 67 हजार 975 रुग्णांपैकी 56 हजार 359 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 359 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 257 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 17 हजार 269 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 760, सातारा जिल्ह्यात 2 हजार 493, सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 486, सांगली जिल्ह्यात 1 हजार 280 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 250 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 14 हजार 304 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 822, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 611, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 52, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 26 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 793 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 68 लाख 6 हजार 678 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 11 लाख 86 हजार 577 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *