Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचापुणे विभागातील १० लाख ३६ हजार ७६९ कोरोना रुग्ण 'कोरोनामुक्त' : सौरभ...

पुणे विभागातील १० लाख ३६ हजार ७६९ कोरोना रुग्ण ‘कोरोनामुक्त’ : सौरभ राव

पुणे : पुणे विभागातील 10 लाख 36 हजार 769 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 लाख 21 हजार 062 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 61 हजार 134 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 23 हजार 159 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.91 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 60 हजार 844 रुग्णांपैकी 7 लाख 48 हजार 870 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 98 हजार 670 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 304 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.99 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 7 हजार 472 रुग्णांपैकी 83 हजार 843 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 21 हजार 289 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 340 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 4 हजार 489 रुग्णांपैकी 83 हजार 730 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 920 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 839 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 78 हजार 343 रुग्णांपैकी 62 हजार 400 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 595 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 69 हजार 914 रुग्णांपैकी 57 हजार 926 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 660 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 328 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 17 हजार 835 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 11 हजार 661, सातारा जिल्ह्यात 2 हजार 142, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 878, सांगली जिल्ह्यात 1 हजार 338 तर कोल्हापूर जिल्ह्यात 816 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 14 हजार 381 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 566, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 301, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 630, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 97 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 787 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 69 लाख 61 हजार 461 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 12 लाख 21 हजार 062 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments