गोकुळची निवडणुक संपताच कोल्हापुरात १० दिवसांचा कडक ‘लॉकडाऊन’

10-day 'lockdown' in Kolhapur after Gokul polls
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक पार पडली असून आज मतमोजणी करण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापूरातील ही निवडणूक संपताच पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरातील वाढती रुग्ण संख्या त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण या पार्श्वभूमीवर पालकंत्री सतेज पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूरात गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्यात आली आहे. दरम्यान या निवडणूकीची सर्व प्रक्रिया पार पडली असून निवडणूक संपताच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून जिल्हास्तरावर कडक लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहेत. या आधी बारामती, सांगली व सातारा या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लावण्यात आले होते. दरम्यान कोल्हापूरात सु्द्धा १० दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *