पिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार 985 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 2 हजार 376 रुग्ण कोरोनामुक्त

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पिंपरी-चिंचवड : पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. शहारात आज मंगळवार रोजी दिवसभरात 1 हजार 985 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या नवीन रुग्णाबरोबर शहरातील कोरोना बाधीत रुग्णांची एकून संख्या 2 लाख 3 हजार 945 वर पोहचली आहे. दरम्यान शहरात दिवभरात 2 हजार 376 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 1 लाख 7 हजार 524 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच शहरामध्ये 23 हजार 645 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

शहरात आज दिवसभरात 91 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 53 रुग्ण शहरातील तर, 38 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात 4 हजार 70 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *