राज्यात उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु होणार

मुंबई : देशातील वाढता ककोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लसीकरण लवकर होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारचे त्या दिशेने योग्य पाऊल पडत आहे. नुकतेच केंद्र सरकारनी १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची संख्या ६ कोटी आहे. त्यांना कोरोना प्रतिबंध लसीचे १२ कोटी डोस द्यावे लागणार आहे. महाराष्ट्र शासनाची १२ कोटी डोसची रक्कम एकरकमी देण्याची तयारी आहे. मात्र, सध्या लसीचा पुरवठा अपुरा होत आहे. केंद्र सरकारने १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी आज तीन लाख डोस दिले असल्याने उद्या पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुकच्या माध्यामतून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यासाठी वेगळे अॅप तयार करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली आहे. जून, जुलै महिन्यात लसीकरणात वाढविणार आहे. आता केवळ ३ लाख लसी आल्या आहेत. नागरिकांनी केंद्रावर जास्त गर्दी करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच लॉकडाऊन बाबत बोलतांना त्यांनी सांगितले कि, महाराष्ट्राची जनता संयम पाळत आहे. अजूनही काही दिवस बंधन पाळावे लागणारे आहे. रोजी मंदावली आहे पण रोटी थांबू देणारं नाही. जर लॉकडाऊन केला नसता तर आज राज्यात रुग्णसंख्या १० लाखापेक्षा अधिक असते. गेल्या काही दिवसात रुग्णवाढ मंदावली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तिसऱ्या लाटेसाठी सज्ज
गेल्या वर्षी २ प्रयोगशाळा केंद्र होते ते आता ६०९ झाल्या आहेत. सध्या ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रात १ हजार २०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. तर सध्या महाराष्ट्राला १ हजार ७०० मेट्रिक टनची गरज आहे. तो मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात काटकसरीने ऑक्सिजन वापरण्यात येत आहे. ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम सुरु आहे. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमी पडू नये याची काळजी घेण्यात येत आहे. तिसरी लाट जरी आली तर ऑक्सिजन कमी पडू देणारं नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केले आहे.
तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञ सांगत आहे. त्यात महाराष्ट्राचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेमुळे जे नुकसान झाले आहे ते तिसऱ्या लाटेत होऊ देणारं नाही. तिसरी लाट थोपवण्यासाठी सरकार सज्ज आहे. लॉकडाऊन जर लावला नसता तर इतर राज्याप्रमाणे आपली परिस्थिती राहिली असती. तर इतर राज्यातील परिस्थिती पाहून कळते. आता आपल्या शेजारील अनेक राज्यांनी लॉकडाऊन केले आहे. चाचणी, लसीकरण महाराष्ट्रात पहिला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले
अनावश्यक रेमडेसिवीर वापरू नका
राज्याला ररोज ५० हजार रेमडेसिवीरची गरज आहे. अगोदर केंद्राकडून राज्याला २६ हजार रेमडेसिवीर देण्यात येत होती. ती वाढविण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. ती ३५ हजार करण्यात आली आहे. अनावश्यक रेमडेसिवीर वापरू नये. असा सल्ला WHO ने दिला आहे. टास्क फ़ोर्स मधील डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.
टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. गेले वर्ष तणातणावात गेले आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणेने उसंत घेतली नाही. नाशिक, विरार सारख्या घटनेमुळे आरोग्य कर्मचारी हताश होतात. जम्बो कोविड सेंटरचे ऑडीत करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली .
पुढचे दोन महिने शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार आहे. ३ कोटी ९४ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.