भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे जावई कॉंग्रेसमध्ये

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारचे स्थापन झाल्या नंतर पक्ष सोडून गेलेले अनेक जण परत येत आहे. नुकतीचे सीताराम गायकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे नेते राधाकृष्ण पाटील यांचे जावई गणेश माने देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काँग्रेस मधून राजकारणास सुरवात केली होती. आता त्याचे जावई गणेश माने देशमुख हे काँग्रेसमधून आपल्या राजकीय जीवनाला प्रारंभ करत आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून इच्छुक होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शेतकर्‍यांचा मेळावा घेतला होता. ते भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी बुधवारी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते.

जयहिंद शुगर्स चे चेअरमन असलेल्या गणेश माने देशमुख यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष उभारणीसाठी प्रचंड मोठा फायदा होणार आहे. सहकार क्षेत्रात जयहिंद परिवाराच्या यशस्वी वाटचालीत गणेश माने यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्यामुळे सोलापूर सह पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. आचेगाव सारख्या अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या तालुक्यातील सीमेवर कारखाना सुरू करून शेतकरी बांधवांना दिलासा दिला देण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी बांधवांच्या प्रति आस्था ठेऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणारे माने कुटुंबीय यांची गणेश माने देशमुख यांच्या रूपाने काम करीत असलेली युवा पिढी आहे.

दुष्काळी भागातील जनतेला आणि शेतकरी यांच्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये तसेच सेंद्रिय शेतीवर काम करणारे एक अभ्यासू उमदे नेतृत्त्व अशी ख्याती आहे. आता त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यामातून आपली राजकीय कारकीर्द अजमावण्यासाठी प्रारंभ केला आहे. त्यांच्या समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गणेश माने बापू हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP) चे विद्यार्थी आहेत. येत्या काळात काँग्रेस पक्षाचे काम तळागाळातील जनतेपर्यंत पोचवून जनतेच्या उत्कर्षात माझा सक्रीय सहभाग नोंदवणार असल्याचं म्हटले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *