पुणे शहरात 3 हजार 871 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 6 हजार 159 रुग्ण कोरोनामुक्त

Worrying! New corona patient record in the country
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णांचा आकडा मंदावला आहे. पुण्यात आज दिवसभरात 3 हजार 871 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक हे की शहरात 6 हजार 156 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान शहरात दिवसभरात उपचारादरम्यान 82 रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये 57 रुग्ण शहरातील तर, 25 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

पुण्यात 4 लाख 6 हजार 526 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्यामुळे 6 हजार 611 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत 3 लाख 54 हजार 840 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आज विविध ठिकाणी 16 हजार 650 स्वॅब तपासणी करण्यात आल्या आहेत. पुणे शहरात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 45 हजार 075 झाली असून 1 हजार 368 रुग्ण हे गंभीर आहेत अशी माहिती पुणे महानगगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *