अशी असेल राज्यातील संचारबंदी; वाचा ब्रेक द चेनची नियमावली

अशी असेल राज्यातील संचारबंदी; वाचा ब्रेक द चेनची नियमावली
मुंबई : कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता आज पासून राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी असणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या दरम्यान अत्यावशक सेवा सुरु राहणार आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु ठेवण्यात येणार आहे.
ब्रेक द चेनची नियमावली
– कलम १४४ राज्यात लागू
– योग्य कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही
-सर्व अस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहणार आहे.
– जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहे.
– मॉल, शॉपिंग सेंटर, सिनेमा हॉल, नाट्यगृह बंद राहणार
-किराणा, मेडिकल सुरु राहणार
– धार्मिक प्रथानास्थळे बंद राहणार
-शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग बंद राहणार
– विवाह समारंभ २५ लोकांना परवानगी
– अंत्यविधीसाठी २० जण उपस्थित राहू शकतात
– धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाना बंदी
– रिक्षात चालक आणि २ प्रवासी
– खासगी वाहनात चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमता
– बस मध्ये पुर्ण प्रवासी क्षमता, उभा राहून प्रवास करण्यास बंदी
– सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करतांना मास्क लावणे अनिवार्य असणार
–